Police Recruitment 2024 : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, राज्यभरात आजपासून…
महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावर पोलीस भरतीची संपूर्ण माहिती उपलब्ध.... पोलीस भरतीमध्ये इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना येत्या ३१ मार्चपर्यंत पोलीस भरतीचा ऑनलाईन अर्ज भरता येणार... मुंबईतील या पोलिसांच्या मेगा भरतीमध्ये कोणत्या पदांची होणार भरती
मुंबई, ५ मार्च २०२४ : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी आहे. राज्यभरात तब्बल १७ हजार पोलिसांच्या भरती प्रक्रियेला आजपासून सुरूवात होत आहे. तर मुंबईमध्ये साडेतीन हजार पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावर पोलीस भरतीची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. पोलीस भरतीमध्ये इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना येत्या ३१ मार्चपर्यंत पोलीस भरतीचा ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. मुंबईतील या पोलिसांच्या मेगा भरतीमध्ये २ हजार ५७२ पोलीस शिपाई, ९१७ चालक पदं भरली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमीत कमी वय १८ आणि जास्तीत जास्त २८ असणे बंधनकारक आहे. ही भरती प्रक्रिया पोलीस शिपाई , पोलीस शिपाई चालक आणि कारागृह कॉन्स्टेबल या पदांसाठी असणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ३१ मार्च असून त्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांना अर्ज भरावा लागणार आहे. यासाठी http://www.mahapolice.gov.in आणि policerecruitment2024.mahait.org या दोन साईटवर जाऊन उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.
Published on: Mar 05, 2024 01:00 PM
निकालाचे वाचन; इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमाध्ये... पवनराजे निंबाळकर प्रकरण
एकच खळबळ! भाजपमध्ये भयंकर घडतंय... नरेंद्र मोदी आहे तोपर्यंतच शांतता..
खासदार फोडणं, आमदार फोडणं... राज्याचा विचका झालाय!; राज ठाकरे भडकले
पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी कोर्टात काय घडतंय? न्यायालयाने नमूद
