Special Report | कोकणच्या भूमीत पुन्हा राजकीय शिमगा

भाजप नेते नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष काही कमी होतानाचे चिन्हं दिसत नाहीय. परिवहन मंत्री अनिल परब हे शिवसेनेचे कलेक्टर आहेत, असं म्हणत नारायण राणेंनी पुन्हा एकदा भाजपला डिवचलं आहे.

भाजप नेते नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष काही कमी होतानाचे चिन्हं दिसत नाहीय. परिवहन मंत्री अनिल परब हे शिवसेनेचे कलेक्टर आहेत, असं म्हणत नारायण राणेंनी पुन्हा एकदा भाजपला डिवचलं आहे. सिंधुदुर्गात नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. एसटी कर्मचारी आत्महत्या करतायत, पगार कित्येक महिने नाही ही एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था आहे. रस्त्यावर येण्याची परवानगी असता कामा नये, अशा गाड्या झाल्यात. त्याच्या उत्पन्नातून एसटी चालवू शकतो एवढं त्यानं कमावलंय. सगळ्यांचे पैसे तो गोळा करतो. तो शिवसेनेचा कलेक्टर आहे ही उद्याची हेडलाईन आहे, असंही म्हणत नारायण राणेंनी नाव न घेता अनिल परबांवर प्रहार केला. शिवसेना नेत्यांनी मात्र नारायण राणेंवर प्रतिहल्ले सुरु केलेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI