'तू बदनाम कर, तेरी औकात...', समर्थकांकडून कुठे झळकले भावना गवळी यांचे बॅनर्स?

‘तू बदनाम कर, तेरी औकात…’, समर्थकांकडून कुठे झळकले भावना गवळी यांचे बॅनर्स?

| Updated on: Mar 05, 2024 | 1:53 PM

संजय राठोड यांच्या मतदारसंघात भावना गवळी यांचे हे पोस्टर झळकल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर मत पुछ मेरे नाम की पहचान कहॉ तक है, तू बदनाम कर तेरी औकात जहॉ तक है... असा आशय बॅनरवर दिसतोय...सध्या त्याचीच यवतमाळमध्ये चर्चा होतेय

यवतमाळ, ५ मार्च २०२४ : यवतमाळच्या दारव्हा शहरात मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. खासदार भावना गवळी यांच्या समर्थकांनी यवतमाळच्या दारव्हा शहरात बॅनरबाजी केली आहे. संजय राठोड यांच्या मतदारसंघात भावना गवळी यांचे हे पोस्टर झळकल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर मत पुछ मेरे नाम की पहचान कहॉ तक है, तू बदनाम कर तेरी औकात जहॉ तक है… असा आशय भावना गवळी यांचा फोटो असलेल्या बॅनरवर पाहायला मिळत आहे. दरम्यान, ‘आम्हाला पराभवाची भिती नाही, कारण आमचा जन्मच संघर्षाच्या मातीत झालाय’, अशा आशयाचे बॅनर लागले होते ते बॅनर नगर परिषदने रात्रीतून बॅनर काढण्यात आल्याची माहिती मिळतेय. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात जोरदार पोस्टर वॉर सुरू आहे. पण नेमकी पोस्टरबाजी कोणासाठी आहे या चर्चा आता सध्या सुरू आहे.

Published on: Mar 05, 2024 01:53 PM