NCP : खेवलकरांच्या फोनमध्ये 252 ‘ते’ व्हिडीओ अन् 1,497 फोटो? खडसेंच्या जावयाच्या प्रकरणावरून दादांच्या राष्ट्रवादीतच जुंपली
प्रांजल खेवलकर पार्टी प्रकरणावरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतल्या दोन महिला नेत्यांमध्ये जुंपले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांनी एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना राष्ट्रवादीच्याच नेत्या रुपाली ठोमरे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं.
प्रांजल खेवलकर प्रकरणावरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या दोन महिला नेत्या एकमेकांना भिडल्यात. पुण्यातल्या खराडी पार्टी प्रकरणात एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक झाली. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत प्रांजल खेवलकर यांच्यावर गंभीर आरोप केले. याला रुपाली ठोंबरे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. प्रांजल खेवलकर प्रकरणात मानवी तस्करी होत असल्याचा संशय सुद्धा चाकणकरांनी व्यक्त केलाय. तर याला खडसेंनी ही प्रत्युत्तर दिलंय.
मानवी तस्करीच्या प्रकरणात नाशिकचं हनी ट्रॅप प्रकरण येत नाही का? असा प्रतिसवाल खडसेंनी केलाय. तर रुपाली चाकणकर यांच्या पत्रकार परिषदेनंतर खडसेंनी चाकणकर जास्तच चेकाळल्या आहेत असं वक्तव्य केलं होतं. तर एकनाथ खडसेंकडून वापरण्यात आलेल्या याच शब्दाचा भाजपकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय. भाजपन खडसेंच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केलं. खडसेंच्या फोटोवर शाईफेक सुद्धा टाकण्यात आली. दरम्यान भाजपच्या या आंदोलनाबद्दल भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री एकनाथ खडसेंनी सुद्धा नाराजी व्यक्त केली. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

