50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज |

केंद्रीय यंत्रणांकडून अनिल परब, रविंद्र वायकर यांना नाहक त्रास दिला जातोय. दरम्यान भाजपशी जुळवून घेतल्यास आपल्या सहकाऱ्यांना होणारा त्रास थांबेल असे मत प्रताप सरनाईक यांनी आपल्या पत्रात व्यक्त केले आहे.

सुपरफास्ट 50 न्यूज

1) शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून शिवसेनेला कमकुवत केले जात आहे, असे म्हणत भाजपशी जुळवून घेण्याचे आवाहन केले आहे.

2) केंद्रीय यंत्रणांकडून अनिल परब, रविंद्र वायकर यांना नाहक त्रास दिला जातोय. दरम्यान भाजपशी जुळवून घेतल्यास आपल्या सहकाऱ्यांना होणारा त्रास थांबेल असे मत प्रताप सरनाईक यांनी आपल्या पत्रात व्यक्त केले आहे.

3) विनाकारण त्रास दिला जोतोय हे प्रताप सरनाईक यांच्या पत्रात नमूद आहे. हाच मुद्दा महत्त्वाचा असून त्या त्रासाला कंटाळून पत्र लिहिले असेल असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

4) सरनाईकांना वाटतं ते आम्हाला अठरा महिन्यांपूर्वी वाटत होतं. या कुठल्याही विषयावर बोलल्यास सामनातून अग्रलेख येईल अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI