70 हजार कोटींची एफडी तोडा, संपूर्ण मुंबईकरांचं मोफत लसीकरण करा: प्रविण दरेकर

70 हजार कोटींची एफडी तोडा, संपूर्ण मुंबईकरांचं मोफत लसीकरण करा: प्रविण दरेकर

मुंबई: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर , आशिष शेलार , मंगल प्रभात लोढा , अतुल भातखळकर आणि राहुल नार्वेकर यांनी मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेनं 70 हजार कोटी रुपयांची एफडी मोडावी आणि मुंबईकरांचं मोफत लसीकरण करावं, अशी मागणी केली आहे. मुंबई महापालिकेचा पालिकेचा मनमानी कारभार चालू देणार नाही, असा इशारा यावेळी दरेकर यांनी दिला.

मुंबईकराना मोफत लस दिली पाहिजे, पालिकेने ग्लोबल टेंडर काढून लस खरेदी करावी. आयुक्तांनी सुध्दा आश्वासन दिलं आहे. पालिकेने स्वतः लस खरेदी करावी, पालिका पक्षपाती कारभार करत आहे. भाजपच्या नगरसेवकांच्या प्रभागात लसीकरण केंद्र दिली जात नाहीत, असा आरोप दरेकर यांनी केला.