“बुडाला आग लागल्यावर ठाकरे मोर्चा काढत आहेत”, भाजप नेत्याची जहरी टीका
दादर येथील शिवसेना भवनमध्ये उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत महापालिकेतल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी 1 जुलै रोजी शिवसेना महापालिकेवर विराट मोर्चा काढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी दिली. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे.
मुंबई : दादर येथील शिवसेना भवनमध्ये उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत महापालिकेतल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी 1 जुलै रोजी शिवसेना महापालिकेवर विराट मोर्चा काढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी दिली. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे आपलं सरकार गेलं, अडीच वर्ष तर तुम्ही काहीच केलं नाही, मातोश्रीत बसून होता. आता महापालिकेच्या भ्रष्टाचारासंबंधी एसआयटीची चौकशी लागली, त्यामुळे तुम्ही हा मोर्चा काढत आहात. बुडाला आग लागल्यावर ठाकरे यांचा थयथयाट दिसत आहे, अशी जहरी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
Published on: Jun 21, 2023 12:06 PM
Latest Videos
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको

