Mumbai Rain | मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाची हजेरी

गुलाब चक्रीवादळामुळे पूर्व किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याचा परिणाम महाराष्ट्रात जाणवणार आहे. आज तसेच पुढील दोन दिवस विदर्भ आणि मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

गुलाब चक्रीवादळामुळे पूर्व किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याचा परिणाम महाराष्ट्रात जाणवणार आहे. आज तसेच पुढील दोन दिवस विदर्भ आणि मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. आज गुलाब चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊन ते कमी दाबाचे क्षेत्र बनले आहे. मात्र मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता कायम असल्याचे हवामान खात्याने वर्तविली आहे. गुलाब चक्रीवादळाने ओडिशाच्या दक्षिण किनारी भागात आणि आंध्रच्या किनारीपट्टी भागात लँडफॉल केले असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI