ITALY च्या रोममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा, मोदींच्या नावाचा जयघोष

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या विशेष विमानाने युरोप दौऱ्यावर रवाना झाले होते, ते आता इटलीची राजधानी रोम येथे दाखल झाले आहेत. दौऱ्यात G-20 आणि COP 26 परिषदांमध्ये पंतप्रधान सहभागी होतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या विशेष विमानाने युरोप दौऱ्यावर रवाना झाले होते, ते आता इटलीची राजधानी रोम येथे दाखल झाले आहेत. दौऱ्यात G-20 आणि COP 26 परिषदांमध्ये पंतप्रधान सहभागी होतील. सुमारे 9 तास 10 मिनिटे हवाई प्रवास केल्यानंतर पंतप्रधानांचे विशेष विमान रोमच्या लिओ नार्डो दा विंची आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. विमानतळावरुन अर्धा तास रस्त्याने प्रवास केल्यानंतर पंतप्रधान हॉटेल वेस्टिन एक्सेलसियर येथे पोहोचले.

हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर अवघ्या साडेतीन तासांनी पंतप्रधान मोदींची पहिली भेट युरोपीय परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेयन यांच्याशी होईल. यानंतर पंतप्रधान मोदी आपल्या हॉटेलमधून थेट पियाजा गांधी येथे जातील आणि तेथे असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याला आदरांजली वाहतील. यानंतर पंतप्रधान मोदी आपल्या हॉटेलमध्ये परततील तेथून ते इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी यांची भेट घेण्यासाठी पलाझो चिगी येथे जातील. कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात, कॉन्सिलिझिओन सभागृहात भारतीय समुदायाच्या लोकांना मोदी भेटतील.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI