मैं देर करती नही, देर हो जाती है; भर सभेत Pritam Munde यांचा Dhananjay Munde यांना टोला

राज्याच्या राजकारणात मुंडे बंधू भगिणीचे नाव अग्रस्थानी आहे. माञ दोघांचे पक्ष वेगवेगळे असल्याने, अनेकदा मुंडे बंधू-भगिनी मधील मतभेद समोर आल्याचं दिसून आले होते. आज मात्र परळीच्या एका कार्यक्रमात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे हे दोघेही एकाच व्यासपीठावर दिसून आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Aug 31, 2021 | 3:35 PM

राज्याच्या राजकारणात मुंडे बंधू भगिणीचे नाव अग्रस्थानी आहे. माञ दोघांचे पक्ष वेगवेगळे असल्याने, अनेकदा मुंडे बंधू-भगिनी मधील मतभेद समोर आल्याचं दिसून आले होते. आज मात्र परळीच्या एका कार्यक्रमात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे हे दोघेही एकाच व्यासपीठावर दिसून आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. परळी शहरात स्वर्गीय मनोहरपंत बडवे सभागृह लोकार्पण सोहळा तसेच विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, आणि खासदार प्रीतम मुंडे या तिघांचीही नाव होती. त्यामुळे हे तिघेही जण एकाच व्यासपीठावर उपस्थित राहतील अशी चर्चा होती.

परंतु भाजप नेत्या पंकजा मुंडे परळीत नसल्यानं त्या या कार्यक्रमास येऊ शकल्या नाहीत. त्यामुळे प्रीतम मुंडे यांनी यावेळी हजेरी लावली, या दृश्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतले होते. प्रीतम मुंडे आणि धनंजय मुंडे हे शेजारी बसले असले तरी, या दोघांमध्ये कोणताही संवाद झाला नाही. परंतु या प्रसंगाने चांगलीच चर्चा घडवून आणली आहे. दरम्यान या कार्यक्रमात दोघा मुंडे बंधू-भगिनीची भाषणातून चांगलीच जुगलबंदी दिसून आली. परळीच्या शहरांतर्गत रस्त्यांची दुरावस्था सांगत खासदार मुंडे यांनी अप्रत्यक्षरीत्या शहरात संथगतीने सुरू असलेल्या कामाबद्दल टीका केलीय.

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें