Prithviraj Chavan : १९ डिसेंबरनंतर मराठी माणूस देशाचा PM होणार? पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १९ डिसेंबरनंतर मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होईल असा खळबळजनक दावा केला आहे. अमेरिकेत सार्वजनिक होणाऱ्या एबस्टिन फाईल्समुळे भारतात मोठा राजकीय भूकंप होईल असे त्यांचे म्हणणे आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, विरोधकांनी टीका केली असली तरी काही नेत्यांनी त्यात तथ्य असल्याची शक्यता वर्तवली आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक खळबळजनक राजकीय दावा केला आहे, त्यानुसार येत्या १९ डिसेंबरनंतर देशात एक मराठी व्यक्ती पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकते. अमेरिकेतील एबस्टिन फाईल्स सार्वजनिक झाल्यानंतर हे शक्य होईल, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. या फाईल्समध्ये काही भारतीय नेत्यांची नावे असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी चव्हाणांच्या वक्तव्यावर टीका करत त्याला “बालिश विधान” आणि “या वर्षाचा सर्वात मोठा विनोद” असे संबोधले आहे. तर, महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी चव्हाण यांच्या दाव्यात काहीतरी तथ्य असण्याची शक्यता व्यक्त केली आहे, कारण ते एक अनुभवी नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत. १९ डिसेंबरला एबस्टिन फाईल्समध्ये नेमके काय समोर येते आणि त्याचे भारतीय राजकारणावर काय परिणाम होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
१९ डिसेंबरनंतर मराठी माणूस PM होणार? पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!

