AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महत्त्वाच्या विधेयकाची प्रस्तावना अजून प्रलंबित, अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातही मोठा गोंधळ

महत्त्वाच्या विधेयकाची प्रस्तावना अजून प्रलंबित, अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातही मोठा गोंधळ

| Updated on: Jul 27, 2026 | 12:41 PM
Share

लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयक सादर होण्याची अपेक्षा होती. मात्र, विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज सुरळीत होऊ शकले नाही. सुरुवातीला दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर गोंधळ कायम राहिल्याने लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज पुन्हा दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.

लोकसभेत आज परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयक सादर होण्याची अपेक्षा होती अजून ते सादर होऊ शकलेले नाही. मात्र, विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज सुरळीत होऊ शकले नाही. सुरुवातीला दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर गोंधळ कायम राहिल्याने लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज पुन्हा दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदस्यांना शांतता राखून सभागृह चालू देण्याचे आवाहन केले. तसेच महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होण्यासाठी गोंधळ टाळण्याची विनंतीही त्यांनी केली. मात्र, विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे परीक्षा सुधारणा विधेयक नियोजित वेळेत सादर होऊ शकले नाही.

NEET पेपरफुटी प्रकरणानंतर हे विधेयक अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता वाढवणे, पेपरफुटी आणि संघटित गैरप्रकारांवर कठोर कारवाई करणे हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचेही या विधेयकाकडे लक्ष लागले आहे. आता दुपारी 2 नंतर सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यास हे विधेयक सादर केले जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 27, 2026 12:41 PM

Follow Us