पुणेकरांचा श्वास गुदमरला! हवेची गुणवत्ता घसरली, पहा शहरातील प्रदुषणाची स्थिती
पुणे शहरातील हवेच्या गुणवत्तेबाबत पर्यावरण अहवालातून चिंताजनक माहिती समोर आली आहे. वर्षभरातील 365 दिवसांपैकी केवळ 92 दिवसच शहरात चांगल्या दर्जाची हवा नोंदवली गेली. त्यामुळे वाढते प्रदूषण आणि त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम हा पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे.

अहवालानुसार, समाधानकारक हवेचे दिवस 122 इतके नोंदविण्यात आले आहेत. याशिवाय 120 दिवस हवा मध्यम श्रेणीत होती, तर 31 दिवस हवेची गुणवत्ता वाईट श्रेणीत पोहोचल्याची नोंद आहे. त्यामुळे शहरातील प्रदूषणाची स्थिती अधिक गंभीर होत असल्याचे दिसून येते.
शिवाजीनगर, विद्यापीठ चौक, कात्रज आणि लोहगाव हे परिसर सर्वाधिक प्रदूषित असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या भागांमध्ये हवेच्या गुणवत्तेवर सातत्याने परिणाम होत असल्याचे निरीक्षण आहे.
Published on: Jul 30, 2026 04:03 PM
पुणेकरांचा श्वास गुदमरला! हवेची गुणवत्ता घसरली, पहा शहरातील प्रदुषणाची
रस्ते की मृत्यूचा सापळा? नाशिकमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांचा चौथा बळी,
विलीनीकरण नाही, पण NDA सोबत जाणार?; पवारांच्या पुढच्या निर्णयाकडे लक्ष
उपोषणानंतर पुन्हा एकदा सोनम वांगचुक चर्चेत, सरकारचं केलं तोंडभर कौतुक,