सासरच्या छळाला कंटाळली; चिठ्ठी लिहिली अन् नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
पुण्यातील बाणेर परिसरात तीन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या गंगा तेजस बेंबळकर या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पती, सासू, सासरे आणि नणंदेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांना सुसाईड नोट सापडली असून, त्यात स्वेच्छेने आत्महत्या केल्याचा उल्लेख आहे, मात्र तिची सत्यता तपासली जात आहे.
पुण्यातील बाणेर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या गंगा तेजस बेंबळकर या महिलेने सासरच्या छळाला कंटाळून इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केली. या घटनेनंतर मृत महिलेच्या वडिलांनी बाणेर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, तिचा पती तेजस बेंबळकर, सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती, सासू, सासरे आणि नणंदेने विवाहितेचा छळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास करत असताना पोलिसांना एक सुसाईड नोट देखील सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये महिलेने मी माझ्या स्वईच्छेने आत्महत्या करत आहे असे नमूद केले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, ही सुसाईड नोट मृत महिलेचीच आहे का आणि त्यावरील हस्ताक्षर तिचेच आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. आरोपींना अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नाही. तीन महिन्यांच्या संसारात नेमका काय छळ झाला, याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
Published on: Feb 28, 2026 11:01 AM
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
