Pue Rain : पहिल्याच पावसात भीमेला पूर अन् गावात शिरलं पाणी… भिमाशंकर परिसरात अतिवृष्टीचा हाहाकार
भीमाशंकर आणि भोरगिरी परिसरात रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसरात हाहाकार माजला आहे. डोंगरकड्यांवरून येणारे ओढे आणि नाले दुथडी भरून वाहत असल्यामुळे नदी-नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे.
पुण्याच्या भिमाशंकर परिसरात अतिवृष्टीचा हाहाकार पाहायला मिळाला असून डोंगरकड्यावरील ओढे नाले दुथडी भरुन वाहिल्याने भीमा नदीला पहिल्याच पावसात पूर आला आहे. भीमानदीवरील बंधारे, पुल पाण्याखाली गेले असून अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे भात पीकांचे नुकसान झाले आहे. भिमाशंकर, भोरगिरी परिसरात शेतातील घरांसह पशुधनांचे नुकसान झाले आहे तर रात्रभर सुरु असलेला पाऊस सकाळी थांबला मात्र शेतीसह पशुधनाचे मोठं नुकसान झालंय. भीमाशंकर परिसरात पावसाने कहर केला आहे. घरात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंसह धान्य भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
भीमा नदीवरील बंधाऱ्यांचे डाफे वेळेवर न उघडल्यामुळे पाणी अनेक गावांमध्ये शिरले. भात खाचरांमध्ये पाणी साचल्याने भातासाठी तयार केलेली भात खाचरं पूर्णपणे नष्ट झाले आहे. पाण्याने खाचरे वाहुन गेली आहेत. अनेक शेतकऱ्यांची शेतातील घरे आणि जनावरांचे गोठेही पाण्याखाली गेले. पशुधन हताहत झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेत. रात्रभर सुरु असलेला पाऊस सकाळी थांबला असला तरी त्याचे परिणाम भीषण आहेत. सध्या हवामान स्थिर असून, स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट

