शिवरायांचा अवमान करणाऱ्याला भाजपने पहिल्या रांगेत बसवलं, कोणता संदेश देऊ पाहताय?; रोहित पवार आक्रमक
Rohit Pawar on BJP : सावरकर गौरव यात्रेवरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे. रोहित पवार नेमकं काय म्हणाले आहेत? पाहा...
पुणे : सावरकर गौरव यात्रेवरून राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे. सावरकर गौरव यात्रेला आमचा विरोध नाही. पण ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर , महात्मा फुले यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आली तेव्हा भाजप आणि शिवसेनेने गौरव यात्रा का काढली नाही?, असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे. काही भोंदू बाबा भाजपला समर्थन करतात म्हणून त्यांच्यावर कारवाई होत नाही. भाजपचे नेते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात विधान केलं आणि काल नागपूरमध्ये भाजपच्या मंचावर ते महाराष्ट्रात पहिल्या रांगेत दिसले. मग भाजपला नेमका संदेश काय द्यायचा आहे? महाराष्ट्रातील थोर व्यक्तींच्या विरोधात बोलणाऱ्यांचं भाजप स्वागत करतं? हाच अप्रत्यक्ष संदेश भाजप देत आहे, असंही रोहित पवार म्हणालेत.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

