Pune : बच्चू कडूंच्या आंदोलकांनंतर पुणे पोलिसांची मीडियावर अरेरावी, बघा व्हिडीओ
पुणे पोलिसांकडून माध्यमांच्या प्रतिनिधीवर दडपशाही होताना दिसतेय. टीव्ही ९ मराठीने आंदोलकांसंदर्भात काही विचारणा पुणे पोलिसांना केली असता त्यांच्याकडून टीव्ही ९ च्या प्रतिनिधीवर दादागिरी करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजा सातवा दिवस आहे. अशातच आज माध्यमांशी बोलताना बच्चू कडून यांनी आपली भूमिका जाहीर केली. आज निर्णय झाला नाही तर 16 तारखेला जलत्यागही करणार असल्याची आक्रमक पवित्रा बच्चू कडू यांनी जाहीर केला. त्यामुळे हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. अशातच आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली तर समिती गठीत होणार, असं अजित पवार म्हणाले.
तर आमचं तोंड दाबवण्याचं पोलिसांकडून काम होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यानंतर पोलिसांकडून प्रहारच्या आंदोलकांवर अरेरावी करत त्यांना ताब्यात घेतलं. इतकंच नाहीतर आंदोलकांनंतर पुणे पोलिसांनी मि़डीयावरही दादागिरी केली. या घडलेल्या प्रकाराचं वार्तांकन माध्यमांकडून केलं जात असताना पुणे पोलिसांकडून विरोध केला जात आहे.

भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण! अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले

मनसेच्या शिबिरात युती बाबत राज ठाकरेंचं मोठं विधान

मुलींच्या शरीरावरून कमेंट्स; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण अन्..

आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल, वांद्रे जमीन पुनर्विकासावरून सवाल
