पुण्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, ‘या’ भागात पावसानं झोडपलं
VIDEO | पुण्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरूवात, अवकाळी पावसामुळे नागरिकांची उडाली चांगलीच तारांबळ
पुणे : पुण्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरूवात झाली आहे. कोथरूड, कर्वेरोड, स्वारगेट, डेक्कन परिसरात पाऊस जोरदार पडण्यास सुरूवात झाली आहे. या अवकाळी पावसामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाली. पुण्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात यलो अलर्ट हवामान खात्यानं दिला होता. यलो अलर्ट असल्याने विजांच्या कडकडाटासह शहरात हलक्या पावसाची शक्यताही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती. तर ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस असतानाही पुणे शहरातील तापमान वाढल्यानं वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचेही पाहायला मिळाले होते. पुणे शहरात आणि जिल्ह्यांत 7, 8, 9 तारखेला विजांच्या कडकडासह शहरात हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तविली होती. या अंदाजानुसार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पुण्यात कोसळल्यानं पुणेकरांची दाणादाण उडाली आहे.
Published on: Apr 09, 2023 06:25 PM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
