विद्यानंद बापट यांचा लाऊडस्पीकरविरोधात हल्लाबोल: “झोंबींशी काय युक्तिवाद करणार?
पुण्याच्या टिळक रस्त्यावर TV9 मराठीने विद्यानंद बापट यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी एक नागरिक आणि विद्यानंद बापट यांच्यामध्ये चांगलीच जुगलबंदी सुद्धा रंगली. ती आपण पाहूया. माझा उद्देश मुळात माझं व्यक्तिमहात्म्य वाढवणे हा नाहीये. तर हा समस्या ही समस्या मुळापासून सुटणे हा उद्देश आहे. आमची एवढीच भूमिका आहे की त्यांनी ह्यात इंटरफेअर जास्त करू नये. कुठचाही लाऊडस्पीकर […]
पुण्याच्या टिळक रस्त्यावर TV9 मराठीने विद्यानंद बापट यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी एक नागरिक आणि विद्यानंद बापट यांच्यामध्ये चांगलीच जुगलबंदी सुद्धा रंगली. ती आपण पाहूया. माझा उद्देश मुळात माझं व्यक्तिमहात्म्य वाढवणे हा नाहीये. तर हा समस्या ही समस्या मुळापासून सुटणे हा उद्देश आहे. आमची एवढीच भूमिका आहे की त्यांनी ह्यात इंटरफेअर जास्त करू नये. कुठचाही लाऊडस्पीकर सार्वजनिक ठिकाणी नकोय. सणा-उत्सवांच्या सबबीखाली नकोय, अन्य कुठच्याही सबबीखाली नकोय. ज्यांना ऐकायचे असतील त्यांनी टिळक स्मारक किंवा अन्य अनेक प्रेक्षागृह आहेत ती, त्यासाठी आहेत, तिथे जाऊन चोवीस तास ते ऐकत बसावेत लाऊडस्पीकर.
मी आता आता या वर्षी मध्ये म्हणायला लागले. याच्या अगोदर बी स्पीकर लागायचे. जेव्हा ज्यांना त्रास होतोय त्यांनी आपल्या गावी जावं सर. आम्ही त्याचं तिकीट काढू, राहायची सोय करू. यांचं येण्याजाण्याचा खर्च देऊ आपण. नाही हे तथाकथित हास्यास्पद आर्ग्युमेंट आहे. हा उफराटा न्याय आहे. याला इंग्रजीत विक्टिम ब्लेमिंग म्हणतात. मराठीत चोर सोडून संन्याशाला सुळी देणे असं म्हणतात. सणासुदीसाठी आता आम्ही बाहेर जावं का? महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात जावं का? दहीहंडी साजरी करण्यासाठी आता आम्ही काय दुसऱ्या देशात जावं का? किंवा दुसऱ्या राज्यात जावं का? गणपती उत्सव साजरा करायला? यांच्याशी युक्तिवाद काय मी करू सांगा ना? झॉम्बी बरोबर कधी युक्तिवाद होऊ शकतो का? तुम्ही झॉम्बी अपोकॅलिप्स मुव्ही बघा, त्याचे गेम बघा. कसे केले जातात? अरे गुडफेथ डिबेट करूया चला. धड धड धड धड. सांगा. झॉम्बी बरोबर युक्तिवाद होऊ शकतो का? त्याचा यात रोलच नाहीये सर. हे सगळ्यांसाठी आहे. हे पूर्ण पब्लिकसाठी आहे.
Published on: Sep 03, 2026 06:37 PM
विद्यानंद बापट: लाऊडस्पीकरवरील वाद, पुण्यातील ध्वनिप्रदूषणावर हल्लाबोल
मराठा आरक्षण: १९९४ च्या निर्णयावरुन विखे पाटील-शरद पवार वाद
तुम्ही स्वतःला देव समजता का? हायकोर्टाच्या प्रश्नावर तुकाराम मुंढे...
मोठी बातमी! FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा थेट निर्णय! आता सर्वसामान्य...

