VIDEO : Nagpur | नागपुरात कचरा संकलनासाठी QR कोड

कचरा संकलनासाठी आलेल्या गाडीचा चालक त्या घरातील QR कोड स्कॅन करणार, आणि त्यानंतर कुठल्या घरातून कचरा संकलन झाले, याची माहिती महानगरपालिका प्रशासनाला मिळणार आहे.

नागपूर महानगरपालिकेकडून घरोघरी जाऊन कचरा संकलनाची सोय करण्यात आलीय. पण गेल्या काही दिवसांत कचऱ्याची गाडी वेळेवर आणि नियमित येत नसल्याची अनेकांची तक्रार होती, यावर समाधान शोधण्यासाठी मनपाने प्रायोगिक तत्त्वावर क्यु आर कोड पद्धती सुरु करण्यात आलीय. कचरा संकलनासाठी आलेल्या गाडीचा चालक त्या घरातील QR कोड स्कॅन करणार, आणि त्यानंतर कुठल्या घरातून कचरा संकलन झाले, याची माहिती महानगरपालिका प्रशासनाला मिळणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर 10 घरात याची सुरुवात झालीय. राज्यातील हा पहिला प्रयोग असल्याचं यावेळी महापौर दयाशंक तिवारी यांनी सांगितले. प्रायोगिक तत्वावर राबवण्यात आलेल्या या प्रयोगाला यश आल्यास संपूर्ण नागपूरमध्ये हा प्रयोग राबवला जाण्याची शक्यता आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI