Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी…
ज्ञानेश कुमार प्रकरणात राहुल गांधींनी मोदी सरकारवर तीव्र हल्ला चढवला आहे. "ज्ञानेश कुमारांसारख्या चोराला का वाचवत आहेत," असा सवाल त्यांनी केला असून, इंडिया आघाडी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची घोषणा केली. दिल्लीत आंदोलकांना रोखले जात असल्याचा आणि पोलिसांकडून संरक्षण दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमार प्रकरणावरून मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. “ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवत आहे,” असा सवाल त्यांनी केला. राहुल गांधींच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनाही ज्ञानेश कुमारांसारख्या व्यक्तीला का वाचवले जात आहे, असा प्रश्न पडला आहे. त्यांनी दावा केला की, पंतप्रधानांची सर्व कुंडली (माहिती) त्यांच्याजवळ आहे आणि मोदी सरकारमधील सुमारे 200 अधिकारी काँग्रेसच्या संपर्कात असून माहिती पुरवत आहेत.
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत इंडिया आघाडी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती राहुल गांधींनी दिली. ते म्हणाले की, सरन्यायाधीशांनी सांगितल्याप्रमाणे ही याचिका दाखल केली जाईल. दिल्लीत आंदोलकांना रोखण्यासाठी रेल्वे आणि मेट्रो सेवा बंद करण्यात आल्या असून, 20 ते 30 हजार पोलीस तैनात करण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला. आरएसएस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडून तरुण आणि महिलांना मारहाण केली जात असल्याचाही दावा त्यांनी केला. संविधानाचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन राहुल गांधींनी केले असून, ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
Published on: Oct 12, 2026 01:44 PM
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....

