AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नीट पेपरफुटीवरून राहुल गांधींचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल; अशात 'त्या' पोस्टची तुफान चर्चा

नीट पेपरफुटीवरून राहुल गांधींचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल; अशात ‘त्या’ पोस्टची तुफान चर्चा

| Updated on: Jul 25, 2026 | 12:38 PM
Share

NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. गेल्या दोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुण, विद्यार्थी आणि आंदोलकांशी इन्स्टाग्रामसह इतर प्लॅटफॉर्मवरून संवाद साधला. त्यांनी NEET प्रश्नपत्रिका फुटीबाबत सरकारची बाजू मांडत सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. गेल्या दोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुण, विद्यार्थी आणि आंदोलकांशी इन्स्टाग्रामसह इतर प्लॅटफॉर्मवरून संवाद साधला. त्यांनी NEET प्रश्नपत्रिका फुटीबाबत सरकारची बाजू मांडत सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. दुसरीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत सरकारवर जोरदार निशाणा साधला.

धर्मेंद्र प्रधान यांना का पाठीशी घातले जात आहे, असा सवाल विरोधकांसह CJP ने उपस्थित केला आहे. त्यानंतर राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत म्हटले, “मेट्रो बंद केली. रास्ते बंद केले. दुकानं बंद केली. इंटरनेट बंद केले. जेवणही बंद केले. आपला हक्क , अधिकार मागणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात सरकारने पावलं टाकली. केवळ एक गोष्ट बंद करू शकले नाही, मोदीजी- ती म्हणजे पेपरफुटी ”

राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे. NEET प्रश्नपत्रिका फुटीपासून ते CJP च्या आंदोलनापर्यंत विविध मुद्द्यांवरून सरकारला लक्ष्य केले जात आहे. विरोधकांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. दरम्यान, जंतर मंतरवरील आंदोलकांची गर्दी अद्याप कायम असून या संपूर्ण प्रकरणाकडे देशाचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 25, 2026 12:38 PM

Follow Us