AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मतभेद, संजय राऊतांच्या 'त्या' दाव्यावर पटोले म्हणताय, 'ही तर...'

ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मतभेद, संजय राऊतांच्या ‘त्या’ दाव्यावर पटोले म्हणताय, ‘ही तर…’

| Updated on: Apr 15, 2023 | 7:35 AM
Share

VIDEO | उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी राहुल गांधी मातोश्रीवर येणार, ठाकरे गट आणि काँग्रेसमधील तूतू-मैंमैं पुन्हा चव्हाट्यावर, बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : विरोधकांच्या एकजूटीचे प्रयत्न सुरू असताना आता राहुल गांधी हे उद्धव ठाकरे यांना भेटणार अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. मात्र असं कोणतं नियोजन नसून ही अफवा असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. या सर्वांमुळे काँग्रेसमध्ये सारं काही अलबेल आहे की नाही? अशी चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांना निमंत्रण दिलं असून ते उद्धव ठाकरे यांना भेटायला येणार आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. सध्या भेटीगाठीचं सत्र सुरू असून काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे हे शरद पवार यांना भेटण्यास गेले. काँग्रेसचे सचिव वेणूगोपाल मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला येणार आहेत तर आता राहुल गांधी मातोश्रीवर येणार असल्याचे सूतोवाच संजय राऊत यांनी केलं. मात्र याला खुद्द काँग्रेसच्या नाना पटोले यांनी अफवा म्हटलंय. त्यामुळे पुन्हा काँग्रसमध्ये आणि ठाकरे गटात एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट