Maharashtra Rain Update : राज्याला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं, राज्यात कुठे कसा होणार पाऊस? IMD चा इशारा काय?
आज पासून पुढील चार दिवस पूर्व मान्सून पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर राज्यातील काही भागात चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
राज्यात मान्सून पूर्व पावसाचा जोर चांगलाच पाहायला मिळतोय. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आजही हवामान खात्याकडून ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील मुंबई आणि ठाणे या भागांसाठी आज यलो अलर्ट आहे तर पुणे आणि कोकणाला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यता आला आहे. यासह पुढचे काही दिवस राज्यात मान्सून पूर्व पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील काही भागांना मान्सून पूर्व पावसाने चांगलंच झोडपल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे मोठे नुसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होणार असल्याने समुद्र देखील पुढील चार दिवस खवळलेला राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याच्या प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. तर आज पहाटेपासून काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय.