Maharashtra Rain Update : पुढील 4 दिवस धोक्याचे… मुंबई, कोकणासह राज्यासाठी IMD चा इशारा काय?
हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळी वारे आणि मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच उन्हाने वैतागलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
राज्यासाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे हैराण झालेल्या राज्यातील प्रत्येक नागरिकाला आता दिलासा मिळणार आहे. कारण आजपासून २४ मे पर्यंत राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मेघगर्जनेसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. पुढील चार दिवस मुंबई आणि कोकणासह राज्यात जोरदार पाऊस बरसणार असल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यान, ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज देखील आहे. हवामान खात्याकडून सातारा, कोल्हापूर, संभाजीनगर, सोलापूर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यंदा मान्सूनचा प्रवास हा वेगाने सुरू असून केरळबरोबरच तमिळनाडूमध्ये आणि ईशान्येच्या राज्यांमध्येही लवकरच मान्सून दाखल होऊ शकतो, अशी शक्यता आहे. हवामान विभागाने २७ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर आता २४ मे पर्यंत राज्यभरात पावसाचा अंदाज व्यक्त केलाय.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?

