Mumbai Rain : मुंबईत पावसाची विश्रांती… लोकल सेवा अन् रस्ते वाहतूक सुरू, पावसामुळे कुठे उडाली दाणादाण?
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पण याच अवकाळी पावसाचा फटका बसून राज्यातील काही भागांना चांगलाच बसला आहे.
मुंबई आणि उपनगरात पावसाची उसंत पाहायला मिळत आहे. काल संध्याकाळपासून पावसाने मुंबईसह उपनगराला चांगलंच झोडपून काढलं होतं. पण आता पावसाने काहिशी विश्रांती घेतली आहे. मात्र ढगाळ वातावरण कायम असल्याचे पाहायला मिळतंय. झोडपणाऱ्या पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा सुरळीत सुरू आहे. त्यामुळे मुंबईकरांना वेळेवर ऑफिसला पोहोचता येणार आहे. तर मुंबईतील पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गावरही वाहतूक सुरळीत सुरू आहे. कालच्या पावसामुळे मुंबईतील लोकल सेवेवर परिणाम झाला होता. त्यामुळे रेल्वे वाहतूक १५ ते २० मिनिटं उशीराने सुरू होती. दरम्यान, आता पावसाने काहिसा ब्रेक घेतला आहे. त्यामुळे रेल्वे वाहतूक पूर्ववत झाली आहे. तर दुसरीकडे मुंबईतील रस्ते वाहतूक देखील सुरळीत होण्याच्या मार्गावर आहे.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब

