Pakistan : हाफिज सईदचा अत्यंत जवळचा आमिर हमजावर गोळीबार, लष्कर ए तोयबाचा सह-संस्थापक गंभीर जखमी
आमिर हमजा जखमी झाला आहे. त्यांना लाहोरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आमिर हमजा हा लष्करचा सह-संस्थापक आहे. त्यांच्यावर लाहोरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमिर हमजा हा लष्करचा एक मोठा दहशतवादी आहे. याशिवाय तो आमिर हमजा आणि हाफिज सय्यद यांच्या खूप जवळचा मानला जातो.
पाकिस्तानातून लष्कर ए तोयबाचा दहशतवादी आमिर हमजा बाबतएक मोठी बातमी समोर येत आहे. लष्कर ए तोयबाचा सहसंस्थापक आमिर हमजावर गोळीबार करण्यात आला आहे. आमिर हमजा हा हाफिज सईदचा अत्यंत जवळचा आहे. गोळीबारात आमिर हमजा गंभीर जखमी झाला आहे. त्याला लाहोरच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, गेल्या तीन महिन्यात तीन मोठ्या दहशतवाद्यांचा पाकिस्तानात अज्ञातांकडून खात्मा करण्यात आला आहे. आता त्यांचं पुढचं टार्गेट आमिर हमजा होता मात्र तो गंभीर जखमी झालाय.
अमीर हमजा याला अचानक रुग्णालयात दाखल केल्याने चर्चांना उधाण आले आहे. ६६ वर्षीय हमजा त्याच्या घरी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्याला आयएसआयच्या संरक्षणाखाली लाहोरमधील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. याच्या फक्त तीन दिवस आधी, लष्कर-ए-तैयबाचा एक हाय प्रोफाइल ऑपरेटिव्ह आणि दहशतवाद्यांची भरती करण्यासाठी जबाबदार असलेला अबू सैफुल्लाह याला पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी गोळ्या घालून ठार मारले.