Raj Thackeray Aurangabad Sabha | थोड्याच वेळात Amit Thackeray सभास्थळी पोहोचणार

आम्ही केसेस घ्यायलाही तयार आहोत, असं मोठं विधान अमित ठाकरे यांनी केलं आहे. त्यामुळे उद्याची राज ठाकरे यांची सभा दणदणीत आणि खणखणीतच होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Apr 30, 2022 | 11:47 AM

औरंगाबाद: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची तिसरी सभा औरंगाबाद येथे उद्या 1 मे रोजी पार पडत आहे. या सभेची मनसेने (mns) जय्यत तयारी केली आहे. या सभेला गर्दीची मर्यादा घालण्यात आली असली तरी ही सभा विक्रमी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसेचे नेते अमित ठाकरे (amit thackeray) यांनी आज सकाळीच मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाऊ मैदानाची पाहणी केली. स्टेज कुठे बांधण्यात येणार आणि कसा बांधला जाणार याची सर्व माहिती त्यांनी घेतली. तसेच काम करणाऱ्या कामगारांशी चर्चाही केली. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. पण मोजकेच बोलले. सभेला आवाजाची मर्यादा घालण्यात आली आहे. हा मोठा अडथळा आहे. त्याकडे तुम्ही कसं पाहता? असं अमित ठाकरे यांना विचारण्यात आलं. त्यावर आम्ही केसेस घ्यायलाही तयार आहोत, असं मोठं विधान अमित ठाकरे यांनी केलं आहे. त्यामुळे उद्याची राज ठाकरे यांची सभा दणदणीत आणि खणखणीतच होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें