Raj Thackeray Sabha Live : मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे.. ; राज ठाकरे निशिकांत दुबेवर कडाडले
Raj Thackeray Sabha LIVE : भाजप खासदार निशिकांत दुबे याला राज ठाकरेंनी मुंबईच्या समुद्रात डुबवून मारण्याचा इशारा दिला आहे.
भाजपचा कोण तरी दुबे नावाचा खासदार काय बोलला. पटक पटक के मारेंगे म्हणाला. झाली का त्याच्यावर केस. हिंदी चॅनलने चालवलं का. काही नाही. कसे असतात ते पाहा. तु आम्हाला पटक पटक के मारणार दुबे? दुबेलाच सांगतो. दुबे, तुम मुंबई में आ जाव. मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे, असा खरमरीत इशारा राज ठाकरे यांनी खासदार निशिकांत दुबे यांना दिला आहे. मराठीच्या मुद्यावर राज ठाकरेंनी घेतलेल्या आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर दुबे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यावर आज मीरा भाईंदरच्या सभेत राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राची बाजू समजून घेतली पाहिजे. सव्वाशे वर्ष राज्य केलं आहे. पर्शियन लोक याला हिंद प्रांत म्हणत. महाराजांची घोषणा काय होती. हे हिंदूवी स्वराज्य व्हावे ही नव्हती. हिंदवी स्वराज्य व्हावं ही होती. हिंद प्रांत आमचा असावा. कुणी सरकार स्थापन करू नये. आम्ही राज्य करणार. आम्ही कुणाचे गुलाम राहणार नाही. मराठीशाहीने राज्य केलं. अटकेपार झेंडे फडकावले. तिथपर्यंत पोहोचले होते मराठे. तो महाराष्ट्र हतबल आहे. तो महाराष्ट्र भिका मागत आहे. तुम्ही या महाराष्ट्राचे राजे. तुम्ही या महाराष्ट्राचे मालक. बाकीचे लोकं बाहेरून आली. त्यांच्यासमोर आम्ही हतबल होणार आणि नही नही भाई…का? स्वत:हून काही करायची गरज नाही. पण अशा प्रकारे माज घेऊन कोणी आला तर ठेचायचा म्हणजे ठेचायचा, असंही राज ठाकरेंनी सांगितलं.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण

