AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जनआंदोलन उभे करुन सरकारला गुडघे टेकायला लावणार

जनआंदोलन उभे करुन सरकारला गुडघे टेकायला लावणार

| Edited By: | Updated on: Mar 15, 2022 | 9:39 AM
Share

राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Shetkari Sanghatana) जनआंदोलन उभे केले होते.महावितरणमध्ये वीज वितरण करताना वर्षाला 25 ते 30 हजार कोटींचा घोटाळा होत आहे.

सातारा : राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Shetkari Sanghatana) जनआंदोलन उभे केले होते.महावितरणमध्ये वीज वितरण करताना वर्षाला 25 ते 30 हजार कोटींचा घोटाळा होत आहे. हा सर्व घोटाळा बाहेर काढणार आहे, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला आहे. येत्या 15 दिवसात महावितरणने (Mahadiscom) योग्य निर्णय घेऊन दिवसा शेतकऱ्यांसाठी वीज उपलब्ध न केल्यास संपूर्ण राज्यात जाऊन व्यापक जनआंदोलन उभे करून या सरकारला गुडघे टेकायला लावणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. यावेळी महावितरण सोबत शेतकऱ्याला दिवसा वीज उपलब्ध व्हावी यासाठी बैठक घेतली असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

महाराष्ट्रातील जनतेला फसवलं जातंय

उन्हाळ्यामध्ये वीजेची मागणी वाढायला लागली आहे. या काळात वीजेची मागणी 23 हजार मेगावॅट पर्यंत जाते. हा लोड समान विभागला जायला हवा त्यामुळं आम्ही शेतकऱ्यांना दिवसा वीज देत नाही, असं अधिकारी म्हणाल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे. 23 हजार मेगावॅटमध्ये शेतकऱ्याची वीज पाच हजार सहाशे मेगावॅट आहे. तर, मग आम्हाला ही वीज का मिळू दिली जात नाही. महानिर्मितीची वीज निर्मिती क्षमता दहा हजार मेगावॅट निर्मिती क्षमता आहे. मात्र, 6500 मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. एनटीपीसीकडून काही वीज खरेदी केली जाते. खासगी जलविद्युत प्रकल्प, पवनचक्की आणि सौर उर्जा याद्वारे वीज उपलब्ध केली जाते. यानंतर, प्राईम टाईमला 10 हजार मेगावॅट वीज घेतली जाते. ही वीज खरेदी करताना महाराष्ट्राच्या जनतेला फसवलं जातंय. पीक आवरला ओपन मार्केटमधून 21 रुपये 29 पैशानं वीज खरेदी केली जाते. तर, पीक आवर नसतान 1 रुपये 68 पैशानं वीज खरेदी केली जाते. पीक आवरला वीज खरेदीकरुन शेतकऱ्याच्या माथी महागडी वीज मारली जात आहे, असं राजू शेट्टी म्हणाले.