स्वाभिमानी शेतकरी संघटना फोडण्यामागे भाजपचा हात? राजू शेट्टी म्हणाले…
रविकांत तुपकर यांना भाजप प्रवेशाची खुली ऑफर देण्यात आली आहे. यावरून रविकांत तुपकर पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या चर्चा रंगू लागल्या. याच पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे, 8 ऑगस्ट 2023 | गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर नाराज असल्याची चर्चा सुरु आहेत. रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वावर उघड नाराजी देखील व्यक्त केली आहे. याच दरम्यान रविकांत तुपकर यांना भाजप प्रवेशाची खुली ऑफर सुद्धा देण्यात आली आहे. यावरून रविकांत तुपकर पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या चर्चा रंगू लागल्या. याच पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “पक्ष आणि संघटना फोडण्याचं अधिकृत काम भाजपचं आहे. स्वाभिमानी संघटनेत जे घडतंय यामागे सुद्धा भाजप असल्याचा संशय आहे. कारण भाजपकडून त्यांना ऑफर दिली जाते, निश्चितच संशयाला जागा आहे. आजच्या बैठकीला रविकांत तुपकर यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. बैठकीसमोर येऊन तुपकरांनी आपलं म्हणणं मांडावं.”
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

