AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! ठाकरेंच्या गटातील नगरसेविका शिंदे सेनेच्या वाटेवर? राजकीय घडामोडींना वेग

मोठी बातमी! ठाकरेंच्या गटातील नगरसेविका शिंदे सेनेच्या वाटेवर? राजकीय घडामोडींना वेग

| Updated on: Jul 12, 2026 | 5:27 PM
Share

मुंबईतील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून ठाकरे गटातील आंदोलनादरम्यान एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. काही आठवड्यांपूर्वी ठाकरे गटातील 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. यामध्ये माजी खासदार संजय दिना पाटील यांचाही समावेश होता. त्यांच्या पक्षांतरानंतर त्यांच्या कन्या आणि नगरसेविका राजुल पाटील या देखील पक्षप्रवेश ठाकरे गटाची साथ सोडतील का? अशा राजकीय चर्चांना उधाण आले होते.

दरम्यान, राजुल पाटील यांनी ठाकरे सेनेतच राहणार असं सांगितलं होतं. मात्र ठाकरे गटाच्या वतीने सभागृहाबाहेर सत्ताधारी पक्ष आणि भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र, या आंदोलनावेळी नगरसेविका राजुल पाटील यांची भूमिका चर्चेचा विषय ठरली. त्या लांबून बघत होत्या. त्यांनी सहभाग घेणं टाळलं.

घोषणाबाजी सुरू असताना राजुल पाटील या केवळ बाजूला उभ्या राहून संपूर्ण घडामोडी पाहत असल्याचे दिसून आले. त्यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला नसल्याचे उपस्थितांच्या निदर्शनास आले.

यापूर्वी राजुल पाटील यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वासोबतच राहणार असल्याची भूमिका जाहीरपणे मांडली होती. त्यामुळे त्यांच्या आजच्या भूमिकेबाबत आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.

Published on: Jul 12, 2026 05:27 PM

Follow Us