Bhagat Singh Koshyari | शरद पवार मोठे नेते, त्यांच्यावर टीका करायलाच हवी का? : भगतसिंह कोश्यारी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका पत्रकार परिषदेत शरद पवारांवर बोलणं टाळलं आहे. यावेळी त्यांनी उपस्थित पत्रकारांना हटके उत्तर दिलं आहे.
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एका पत्रकार परिषदेत शरद पवारांबाबत प्रश्न विचारण्यात आला असता. त्यांनी मोठ्या चतुराईने त्याबद्दल बोलण्यास नकार दिला. राज्यपाल उपस्थित असलेल्या पत्रकार परिषदेत तेथील पत्रकारांनी शरद पवारांबाबत राज्यपालांना प्रश्न विचारला. पत्रकार परिषद जवळपास संपत आली असताना हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी नेमका कोणाबाबत हा प्रश्न आहे? असं कोश्यारी यांनी विचारले. ज्यानंतर त्यांनी शरद पवारांचे नाव ऐकले असता त्याबद्दल अर्थात पवारांबद्दल बोलणे साफ टाळले. ‘शरद पवार मोठे नेते, त्यांच्यावर टीका करायलाच हवी का?’ असा मिश्किल प्रश्नही त्यांनी पत्रकारांना विचारत पवारांबाबतच्या प्रश्नाचं कोणतच उत्तर दिलं नाही.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

