Video : ‘अहिल्यादेवी होळकर जयंतीला रोहित पवारांनी राजकीय स्वरुप दिलं’ राम शिंदे यांची टीका
राहित पवार यांनी अहिल्यादेवी होळकर जयंतीला राजकीय स्वरुप दिल्यानं वादग्रस्त आणि संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली असल्याचं राम शिंदे यांनी म्हटलंय.
अहमदनगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 297 वी जयंती आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्यात येत असलेल्या कार्यक्रमाची राम शिंदे यांनी टीका केली. रोहित पवार यांच्यावर राम शिंदे यांनी निशाणा साधला. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतील पक्षीय स्वरुप देणं गैर असल्याचं ते म्हणालेत. टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी कुणाल जायकर यांच्यासोबत त्यांनी बातचीत करताना रोहित पवार यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घेतल्या गेलेल्या कार्यक्रमामुळे अहिल्यादेवी होळकर यांच्यावर निस्सिम प्रेम करणाऱ्यांची, अहिल्याभक्तांची कुचंबणा झाली असल्याचं राम शिंदे यांनी म्हटलं आहे. ज्यावेळी पक्षीय जयंती एक साजरा करतो, तेव्हा इतरही त्याचप्रमाणे मागणी करतात, असं म्हणत त्यांनी गोपीचंद पडळकरांची बाजू घेतली आहे. राहित पवार यांनी अहिल्यादेवी होळकर जयंतीला राजकीय स्वरुप दिल्यानं वादग्रस्त आणि संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली असल्याचं राम शिंदे यांनी म्हटलंय.
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?

