Special Report | तणाव हलका करण्यासाठी आठवलेंचे ‘हास्य’तीर
मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे तसेच त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वानखेडे यांनी आपले धर्मांतर लपवून नोकरी बळकावल्याचा आरोप मलिक यांनी केलाय. हे सर्व आरोप वानखेडे तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी फेटाळले आहेत.
मुंबई : मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे तसेच त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वानखेडे यांनी आपले धर्मांतर लपवून नोकरी बळकावल्याचा आरोप मलिक यांनी केलाय. हे सर्व आरोप वानखेडे तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी फेटाळले आहेत. वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी वेळोवेळी पत्रकार परिषद घेऊन मलिक यांच्यावर टीका केलेली आहे. आज रामदास आठवले यांनी वानखेडे परिवाराला पाठिंबा दर्शविला. तसेच क्रांती रेकडर आणि ज्ञानदेव वानखेडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहिले. मागच्या 4 दिवसांपासून क्रांती रेडकर यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत आहे. मात्र आज आठवलेंच्या कविता आणि विनोदबुद्धीमुळे त्यांनादेखील हसू आवरले नाही.
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं

