VIDEO : Ramdas Athwale Uncut | शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंमधील संघर्ष पक्षांतर्गत – रामदास आठवले

राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर रामदास आठवले यांनी महत्वाचे विधान केले आहे. रामदास आठवले म्हणाले की, शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंमधील संघर्ष पक्षांतर्गत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत मोठा गट आहे. त्यामुळे शरद पवार आमच्याकडे बहुमत आहे, अशी भूमिका मांडणे अयोग्य आहे. बहुमत सिद्ध करण्याचा आपल्याला अधिकार आहे.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 25, 2022 | 2:33 PM

राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर रामदास आठवले यांनी महत्वाचे विधान केले आहे. रामदास आठवले म्हणाले की, शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंमधील संघर्ष पक्षांतर्गत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत मोठा गट आहे. त्यामुळे शरद पवार आमच्याकडे बहुमत आहे, अशी भूमिका मांडणे अयोग्य आहे. बहुमत सिद्ध करण्याचा आपल्याला अधिकार आहे. जवळपास 45 आमदार तुमच्यापासून वेगळे आहेत. असे असताना तुमचे बहुमत असूच शकत नाही. त्यामुळे निर्णय घेण्याचा कुठलाही अधिकार या सरकारला नाही. 16 आमदारांना निलंबित करण्याची हालचाल सुरू आहे. मात्र त्यांना तुम्हाला निलंबित करता येणार नाहीत. 37 आमदार शिंदेंसोबत आहेत. तर व्हीप हा हाऊसमध्ये असतो, बाहेर नाही. म्हणून पक्षातून काढता पण आमदारकी रद्द करा, अशी मागणी करण्याचा अधिकार उपसभापतींना नाही, असे आठवले म्हणाले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें