VIDEO : Ramdas Kadam | रामदास कदम यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं

शिवसेना नेते रामदास कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. 6 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांना रामदास कदम यांनी पत्र पाठवलं आहे. अनिल परब यांच्यावरील आरोपासंदर्भातील एक ऑडिओ क्लिप व्हायरलं झाली होती. यासंदर्भात कदम यांनी त्यांची बाजू पत्राद्वारे मांडली आहे.

शिवसेना नेते रामदास कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. 6 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांना रामदास कदम यांनी पत्र पाठवलं आहे. अनिल परब यांच्यावरील आरोपासंदर्भातील एक ऑडिओ क्लिप व्हायरलं झाली होती. यासंदर्भात कदम यांनी त्यांची बाजू पत्राद्वारे मांडली आहे. त्यानंतर रामदास कदम यांना दसरा मेळाव्याल एन्ट्री नसल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. शिवसेनेची परंपरा असलेला दसरा मेळावा ष्णमुखानंद सभागृहात पार पडत आहे. रामदास कदम या मेळाव्याला हजर राहणार का याबाबत चर्चा सुरु आहेत. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळं रामदास कदम यांनी दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नसल्याचं कळवलं आहे. इन्फेक्शन टाळण्यासाठी उपस्थितीविषयी निर्णय घेतला आहे. रामदास कदम यांनी ऑडिओ क्लिप प्रकरणी त्यांच्या वेदना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कळवल्या आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI