झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन पेटलं, पोलिसांकडून पाण्याचा मारा, चपला-बूट…नेमकं काय घडतंय?
रांचीमध्ये JPSC-JSSC परीक्षेतील कथित अनियमिततेविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. विधानसभेला घेराव घालण्यासाठी विद्यार्थ्यांनी विधानभवनाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न झाल्याने आंदोलनस्थळी तणाव निर्माण झाला होता.

विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा मारा केला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. या कारवाईनंतर काही आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेने चपला आणि बूट फेकल्याचे समोर आले. त्यामुळे परिसरातील परिस्थिती आणखी तणावपूर्ण झाली. पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करत सुरक्षा व्यवस्था कडक केली.
राँचीचे पोलीस प्रमुख पारस राणा यांनी या कारवाईबाबत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “पोलिसांनी वारंवार समज देऊनही आंदोलक ऐकण्यास तयार नव्हते. ते बैरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.”
तसेच, “पोलीस विद्यार्थ्यांच्या विरोधात नसून प्रशासन त्यांच्या मागण्यांबाबत संवेदनशील आहे,” असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे रांचीमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे.
Published on: Aug 10, 2026 03:43 PM
झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन पेटलं, पोलिसांकडून पाण्याचा मारा
मोठी बातमी! फुटीर खासदारांमध्ये चलबिचल सुरु; ठाकरे गटाच्या नोटीसनंतर..
NEET पेपरफुटीवर सरकारची कोंडी? अमित शाह देणार उत्तर!
मराठी सक्तीबाबत प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा! 105 दिवसांचा कालावधी...