RCB Rally : विजय रॅलीत 10 जणांचा मृत्यू, तरीही स्टेडियममध्ये सत्कार समारंभाचा जल्लोष केला
Bengaluru News : आरसीबीच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या विजय रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीनंतर देखील क्रिकेट टीमचा सत्कार सोहळा पार पडला.
बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमबाहेर आयपीएल २०२५ चॅम्पियन आरसीबीच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या विजय रॅली आणि सत्कार समारंभात मोठी दुर्घटना घडली असून याठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीत 10 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे एकीकडे ही चेंगराचेंगरी सुरू असताना आणि 10 लोकांचे जीव गेलेले असताना देखील दुसरीकडे स्टेडियममध्ये आरसीबीच्या टीमचा सत्कार सोहळा मात्र सुरुच होता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा संपूर्ण सोहळा पार पडला.
एम चिन्नास्वामी या स्टेडियमच्या क्षमतेपेक्षा जास्त संख्येने या ठिकाणी चाहत्यांना आपल्या लाडक्या आरसीबीच्या संघाला बघण्यासाठी एकच गर्दी केल्याने परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेली. यावेळी गर्दीला अवरण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. मात्र यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 10 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे 18 वर्षांनी आरसीबीने मिळवलेल्या या विजयाला 24 तासांच्या आतच गालबोट लागलं आहे.
दरम्यान, या घटनेनंतर आता नागरिक आपल्या घराकडे निघालेले आहे. त्यामुळे मेट्रो रेल्वे स्टेशनवर देखील मोठी गर्दी झालेली बघायला मिळत आहे.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

