तर हिंदू दलितांवर अन्याय करणाऱ्यांना फाशी द्या, कालीचरण महाराज यांना कुणाचं थेट आव्हान
VIDEO | कालीचरण बाबा तुम्ही खरंच हिंदुत्ववादी असाल तर राज्यात मोर्चे काढून हिंदू दलितांवर अन्याय करणाऱ्यांना फाशी द्या अशी मागणी करणार का?, कुणी उपस्थित केला सवाल
मुंबई : महाराष्ट्र राज्यामध्ये काही हिंदुत्ववादी संघटना आणि स्वतःला हिंदुत्ववादी नेते म्हणून घेणारे लव जिहाद विरोधी कायदा करा, यासाठी मोर्चे काढताना दिसत आहे. आता तर कालीचरण महाराज म्हणाले लव जिहाद करणाऱ्यांना फाशी द्या परंतु कालीचरण बाबा तुम्ही खरंच हिंदुत्ववादी असाल तर तुम्हाला हिंदू दलित समाजावर गेले हजारो वर्ष अत्याचार होतो तो दिसत नाही का? त्यासाठी तुम्ही मोर्चे कधीच काढले नाही, कालीचरण बाबा खरंच तुम्ही हिंदुत्ववादी असाल तर महाराष्ट्र राज्यात मोर्चे काढून हिंदू दलितांवर अन्याय करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करणार का? असा प्रश्न रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी उपस्थित केला आहे. बघा नेमकं काय म्हटले…
तुकाराम मुंढेंच्या FDAच्या कारवाईवर फडणवीसांची स्पष्ट प्रतिक्रिया,
KDMC मध्ये अजब प्रकार! पालिका कर्मचाऱ्याचा मराठी बोलण्यास स्पष्ट नकार,
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत, महाराष्ट्रातील बड्या नेत्याकडे मोठी..
नाही नाही म्हणत असले तरी फडणवीसांना दिल्लीत... बड्या नेत्याचं विधान
