ऐकावं ते नवलंच! श्वानांचा विधीवत विवाह संपन्न, कुठं घडली ‘श्वानांच्या लग्नाची गोष्ट’

हर्षदा शिनकर

Updated on: Jan 25, 2023 | 7:52 AM

ज्या प्रमाणे लग्नात मंगलअष्टक आणि अंतरपाट धरण्याला विशेष महत्त्व असते, तसे विधी या श्वानांच्या लग्नातही झाल्याने या विवाहाची होतेय चर्चा

दोन व्यक्ती विवाह बंधनात अडकणं ही सामान्य बाब आहे. पण तुम्ही कधी श्वानांचा विवाह झाला, असे कधी ऐकलं आहे का? हो जरी हे अतिश्योक्ती वाटत असलं तरी हे खरं आहे. श्वानांचा विधीवत विवाह संपन्न झाल्याची घटना समोर आली आहे. श्वानांचा झालेला विधीवत विवाह हा चर्चेचा विषय ठरत आहे.

मुंबईतील सानपाडा येथे रिओ आणि रिआ नावाच्या दोन श्वानांचा विवाह नुकताच संपन्न झाला आहे. विशेष म्हणजे यावेळी श्वानाची वरात देखील काढण्यात आली आहे. यामुळे हा श्वानांचा विवाह सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. या श्वानांच्या विवाहाला वऱ्हाडासह पाहुण्यांची देखील हजेरी पाहायला मिळाली. ज्या प्रमाणे लग्नात मंगलअष्टक आणि अंतरपाट धरण्याला विशेष महत्त्व असते, तसे विधी या श्वानांच्या लग्नातही झाल्याचे या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI