येवल्यात रस्ता रोको; विंचूर चौफुलीवर लागल्या वाहनांच्या रांगा
येवल्यात गेल्या एक ते दीड तासापासून विस्थापित गाळेधारकांचे रस्ता रोको आंदोलन सुरु केले आहे.
उमेश पारिक, प्रतिनिधी.
येवल्यात गेल्या एक ते दीड तासापासून रस्ता रोको सुरु केले आहे. मालेगाव-पुणे व नाशिक-छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गांवरील विंचूर चौफुली येथे रस्तारोको आंदोलन केले. विस्थापितांना ई लिलाव न करता गाळे द्यावे, या मागणी आमदार किशोर दराडे यांच्या नेतृत्वाखाली रस्तारोको आंदोलन सुरु केले आहे. यामुळे महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या बघायला मिळाल्या. आंदोलनाला विस्थापित गाळेधारकांनी गर्दी केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी यावेळी निर्माण झाली होती.
दरम्यान, यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या स्थळी भेट देऊन यावर पुढच्या 15 दिवसांत तोडगा काढू असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र पंधरा दिवसात निर्णय न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी आमदार किशोर दराडे यांच्यासह आंदोलकांनी दिला आहे.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली

