Video | शरद पवार यांच्यावर टीका करण्यासाठी गोपीचंद पडळकर यांना आमदारकी : रोहित पवार
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर गाडीवर दगडफेक करणाऱ्या तरुणाचे आमदार रोहित पवार यांच्यासोबतचे फोटो पडळकर यांनी ट्विट केले आहेत.
अहमदनगर : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर गाडीवर दगडफेक करणाऱ्या तरुणाचे आमदार रोहित पवार यांच्यासोबतचे फोटो पडळकर यांनी ट्विट केले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी तसेच रोहित पवार यांच्यावर टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणावर दगडफेक करणं हे चुकीचं आहे. ती आपली संस्कृती नाही. पण त्या तरुणाच्या मागचा विचार करणे गरजेचे आहे. भाजपच्या मोठ्या नेत्यांनी पडळकरांच्या वक्तव्याबद्दल सांगावं. त्यांनी जे वक्तव्य केलं ते आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभतं का ? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

