Video : ते तोडण्याचा प्रयत्न करतील, आम्ही जोडण्याचा प्रयत्न करू- रोहित पवार
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केलं आहे. एकनाथ शिंदे हे सध्या सुरतला असून, त्यांच्यासोबत शिवसेनेचे 35 आमदार असल्याचा दावा भाजपकडून (BJP) करण्यात येत आहे. यामुळे शिवसेनेच्या (shivsena) गोटात खळबळ माजली आहे. एकनाथ शिंदे हे भाजपमध्ये जाणार असल्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यांशी संपर्क झाला […]
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केलं आहे. एकनाथ शिंदे हे सध्या सुरतला असून, त्यांच्यासोबत शिवसेनेचे 35 आमदार असल्याचा दावा भाजपकडून (BJP) करण्यात येत आहे. यामुळे शिवसेनेच्या (shivsena) गोटात खळबळ माजली आहे. एकनाथ शिंदे हे भाजपमध्ये जाणार असल्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यांशी संपर्क झाला असून, राज्यात राजकीय भूकंप वगैरे काही येणार नसल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. आता या सर्व प्रकारावर राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहीत पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. तो शिवसेनेचा अंतर्गत मामला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आम्ही जोडण्याचे काम करतो मात्र काही जण तोडण्याचे काम करतात असे म्हणत त्यांनी भाजपावर देखील निशाणा साधला आहे. आम्ही आमच्या नेत्यांच्या सोबत आहोत, ते जसे म्हणतील तसं करू असे रोहीत पवार यांनी म्हटले आहे.
Published on: Jun 21, 2022 12:50 PM
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...

