Video: पुरणपोळ्या पुन्हा चर्चेत! चक्क रोहित पवारांनी पुरणपोळ्या बनवल्या, जमल्या की कुसकरल्या?

त्यावेळी त्यांनी आग्रहाने आणि आपुलकीनं पुरणपोळ्या रोहित पवारांना खाऊ घातल्या. तेव्हा पोळ्या बनवण्याचा प्रयत्न चक्क रोहित पवार यांनी केला.

सिद्धेश सावंत

|

May 11, 2022 | 7:05 AM

नागपूर : आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पुरणपोळ्या बनवण्याचा प्रयत्न केला. आपलं किचन स्किल (Kitchen Skill) त्याांनी सोशल मीडियावरुन शेअर केलाय. याबाबतचे फोटोही त्यांनी शेअर केलेत. नागपूर दौऱ्यावर असताना त्यांनी प्रवीण राजणे यांच्या घरी भेट दिली. त्यावेळी त्यांनी आग्रहाने आणि आपुलकीनं पुरणपोळ्या रोहित पवारांना खाऊ घातल्या. तेव्हा पोळ्या बनवण्याचा प्रयत्न चक्क रोहित पवार यांनी केला. त्या त्यांना थोड्याफार प्रमाणात यशही आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान आणि अनुभवी कार्यकर्ते म्हणून प्रवीण राजणे यांचे वडील मुनिराज राजणे हे ओळखले जातात. याआधीही अनेकदा शरद पवार यांनीही त्यांच्या घरी भेटी दिल्या आहेत. काटोल येथील सोनोली येथे ही भेट घेण्यात आली होती.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें