AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi : NCB च्या कारवाईत सुमारे 350 कोटींचे 97 किलो ड्रग्ज जप्त

Delhi : NCB च्या कारवाईत सुमारे 350 कोटींचे 97 किलो ड्रग्ज जप्त

| Updated on: Apr 29, 2022 | 7:28 PM
Share

या अमली पदार्थांची तस्करी म्हणजे दिल्लीसह शेजारील राज्यातील भारत अफगाणिस्तान दरम्यानचं सिंडिकेटचं प्रकरण आहे. स्थानिक पातळीवर हेरॉइन बनवणे आणि त्यात भेसळ करण्यात येतात. या सिंडिकेटचा महोरक्या दुबईत राहत असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

नवी दिल्ली: एनसीबीने (ncb) दिल्लीच्या जामिया नगरमधील शाहीन बाग (shaheen bagh) परिसरात मोठी छापेमारी केली आहे. एनसीबीने या छापेमारीत 50 किलोग्रॅम उच्च प्रतीचे हेरॉईन जप्त केले आहे. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या ड्रग्जची किंमत जवळपास 100 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. हा ड्रग्जचा साठा म्हणजे आंतरराष्ट्रीय नेक्ससचा एक भाग आहे. भारत-अफगाणिस्तान तस्करीच्या रॅकेटचा या माध्यमातून भांडाफोड करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. एनसीबीचे उप महासंचालक संजय कुमार सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन या बाबतची माहिती दिली. दिल्लीच्या रहविशी परिरसरात ऑपरेशन केलं. त्यात 30 लाखाची रोख रक्कम सापडली आहे. औषधांचे बॅकपार्क (Flipkart) आणि बॅगेज ही रक्कम आणि ड्रग्ज लपवले होते. फ्लिपकार्ट आणि अन्य कंपन्यांच्या पाकिटातही हे पैसे आणि ड्रग्स लपवण्यात आले होते, अशी माहिती संजय कुमार सिंह यांनी सांगितलं.