Mohan Bhagwat : बाकी सब आये, चमके, चले गये… हिंदूंच्या अस्तित्वावर मोहन भागवत यांचं मोठं विधान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी "हिंदू अस्तित्वात राहिले नाही तर जगाचे अस्तित्व संपेल", असे महत्त्वपूर्ण विधान केले आहे. भारत हे एका अमर संस्कृतीचे नाव असून हिंदू धर्माने एक नेटवर्क निर्माण केल्याचे भागवत यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. “हिंदू अस्तित्वात राहिले नाही तर जगाचे अस्तित्व संपेल”, असे भागवत यांनी म्हटले आहे. त्यांनी भारत हे एका अमर समाजाचे, अमर संस्कृतीचे नाव असल्याचे सांगितले.
मोहन भागवत म्हणाले, “भारत हे एक अमर समाज, अमर सिव्हिलायझेशन का नाम है. बाकी सब आये, चमके, चले गये. लेकिन इन सबके उदय और अस्त हमने देखे और हम अभी भी है और रहेंगे. एक बेसिक नेटवर्क ऐसा हमने बनाया है अपने समाज का. उसके चलते हिंदू समाज रहेगा. हिंदू नही रहेगा तो दुनिया नही रहेगी. समय समय पर उसको जीकर दुनिया को देना, ये हिंदू समाज ही करेगा. उसका ये ईश्वर प्रदत्त कर्तव्य है.” हिंदू धर्मानं एक नेटवर्क निर्माण केले आहे, असेही त्यांनी म्हटले. या विधानामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक स्तरावर चर्चा सुरू झाली आहे.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन

