AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | ओबीसी आरक्षणावरुन सत्ताधारी - विरोधक आमने सामने

Special Report | ओबीसी आरक्षणावरुन सत्ताधारी – विरोधक आमने सामने

| Edited By: | Updated on: Sep 12, 2021 | 11:19 PM
Share

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. ओबीसींना आरक्षण न मिळण्यास भाजपच जबाबदार आहे. (Nana Patole slams BJP over OBC reservation)

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. ओबीसींना आरक्षण न मिळण्यास भाजपच जबाबदार आहे, असा आरोप करतानाच केंद्र सरकारने तातडीने इम्पिरिकल डेटा द्यावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. राज्य सरकारने मागास आयोग तयार करावा. त्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा तयार करावा आणि पुन्हा कोर्टात यावे, असा सर्वोच्च न्यायालयानेच आदेश दिला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांच्याकडील डेटा आम्हाला द्यावा. तो कोर्टात दिल्यास ओबीसींना आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असं नाना पटोले यांनी सांगितलं. (Ruling party VS opposition party on OBC reservation, Maharashtra)

तर आयोगच बनवला नसता

मागास आयोग डेटा गोळा करण्याचं काम करणार आहे. पण आयोग लोकांपर्यंत पोहचत असताना कोरोना सुद्धा आहे याचा विचार करावा लागेल. केंद्र सरकारने सांगितलं आहे. आम्ही जाती जनगणना करायची नाही. त्यामुळे आयोगाने डाटा गोळा करण्यासाठी 450 कोटी रुपये मागितले आहेत. ओबीसींना आरक्षण न देण्याची राज्य सरकारची भूमिका नसती तर आयोग बसविला नसता, असंही त्यांनी सांगितलं.

(Ruling party VS opposition party on OBC reservation, Maharashtra)