AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरात आधीच गुवाहाटीतील हॉटेलमध्ये... रुपाली चाकणकरांनी स्वतःच सांगितलं 8 तासांच्या चौकशीत नेमकं काय घडलं? तिसऱ्यांदा चौकशीसाठी...

खरात आधीच गुवाहाटीतील हॉटेलमध्ये… रुपाली चाकणकरांनी स्वतःच सांगितलं 8 तासांच्या चौकशीत नेमकं काय घडलं? तिसऱ्यांदा चौकशीसाठी…

| Updated on: May 15, 2026 | 12:02 PM
Share

राज्य भरात गुन्हेगारीचे प्रकरण दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या काही काळापासून अशोक खरात प्रकरणात अनेक महत्त्वाच्या अपडेट्स समोर येत आहेत.

राज्य भरात गुन्हेगारीचे प्रकरण दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या काही काळापासून अशोक खरात प्रकरणात अनेक महत्त्वाच्या अपडेट्स समोर येत आहेत.
भोंदूगिरी आणि फसवणूक करणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं आहे. भोंदू खरातवर आत्तापर्यंत एक दोन नव्हे तर तब्बल 13 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि त्यांच्या बहिण प्रतिभा चाकणकर यांचं नाव वारंवार घेतलं जात होतं. त्यानंतर त्याच्या चौकशीच्या मागणीने जोर धरला होता. तीन ते चार दिवसांपूर्वीच रुपाली चाकणकरांची तब्बल साडेपाच तास चौकशी करण्यात आली. या नंतर काल (14 मे 2026) पुन्हा त्यांची आठ तास चौकशी करण्यात आली. यावेळी अनेक बाबी समोर आल्या आहेत.

अलीकडील माहितीनुसार, रुपाली चाकणकरांच्या आठ तास चाललेल्या चौकशीत त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यांचे आणि खरातचे आर्थिक संबंध काय होते, यावरील माहिती समोर आणण्यासाठी रुपाली चाकणकरांच्या पतीचेदेखील कार्यालयीन कागदपत्र एसआयटीने जमा करून घेतले. या दरम्यान, प्रतिभा चाकणकरांचा मुलगा तन्मय याचादेखील जबाब नोंदवला गेला. या चौकशी दरम्यान रुपाली चाकणकरांनी खरात सोबत गुवाहाटीतील कोणत्याच हॉटेलमध्ये मुक्काम केला नव्हता असंही सांगितलं. गुवाहाटीतील सर्व आरोप फेटाळत त्यांनी ‘खरात आधीच तिथे पोहोचला होता, आम्ही नंतर गेलो होतो, तो आम्हाला अचानकच भेटला.’ असंही नमूद केलं. महत्त्वाची बाब म्हणजे पोलिस त्यांना तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलवण्याच्या तयारीत आहेत. या प्रकरणातील सखोल तपास सुरू असून आणखी अनेक धागेदोरे सापडण्याची शक्यता आहे.

Published on: May 15, 2026 11:41 AM
Follow Us