रुपाली चाकणकर यांनी एक वर्षांपूर्वी खरातला वाचवले, रुपाली ठोंबरे पाटील यांचा आरोप
भोंदूबाबा अशोक खरात याला त्यांच्या गुन्ह्यात मदत केल्याच्या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना सहआरोपी म्हणून अटक करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे.
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याने महिलांना मी तुम्हाला देवाचा आशीर्वाद देतो, तुमच्या समस्या सुटतील असे सांगत फसवले. आणि त्याने अत्यंत किळसवाणे प्रकार केले. या सर्व गोष्टीला कारणीभूत राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर जबाबदार आहेत, त्यांच्या संगमताने त्या भोंदूबाबाने हे सर्व केले आहे हे प्रथमदर्शनी दिसत असल्याचा असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला आहे.त्यांना सर्व माहिती असून सुद्धा त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे. एसआयटीकडे हे सर्व आलेले आहे त्यामुळे चाकणकर यांना मुख्य सूत्रधार म्हणून तातडीने अटक करावी अशीही मागणी रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे. ‘खबरदार पुढारी’ या वृत्तपत्राने या भोंदूबाबाचा भंडाफोड एक वर्षांपूर्वी केला होता. त्यावेळी चाकणकर यांनी त्या पत्रकाराला धमक्या दिल्या आणि पदाचा वापर करुन त्या पत्रकारावर पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. म्हणजे चाकणकरांनी या भोंदूबाबाला एक वर्षांपूर्वी वाचवले. भोंदूबाबा खरातला त्याच्याकडील व्हिडीओवरुन दोन मुलांनी ब्लॅकमेल करायला सुरुवात केली होती. ती मुले पुण्यातील एका सामाजिक कार्यकर्तीला काही महिन्याआधी भेटले होते. त्या सामाजिक कार्यकर्त्या गुरुमाऊली म्हणणाऱ्या बाबाला भेटल्या आणि त्यांच्यात पुन्हा तडजोड झाली. आता त्या सामाजिक कार्यकर्त्या कोण हे सर्व तपासात समोर येईल असेही त्यांनी सांगितले.
Published on: Mar 22, 2026 10:25 AM
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाल
2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात

